Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे मॉडेल राज्यभरात सरस – पार्थ पवार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – गुजरातच्या विकासाचे मॉडेल देशाच्या समोर मांडले जाऊ शकते. तर, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने केलेल्या विकासाचे मॉडेल राज्यभरात का मांडू नये, असा प्रश्न मावळ लोकसभा मतदार संघांचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उपस्थित केला. तसेच, निगडी येथे त्यांनी नागरिकांशी विविध मुद्यांवर चर्चा केली.

लोकसभा निवडणुका अवघ्या 35 दिवसांवर येऊन ठेवल्याने उमेदवारांचे प्रचारदौरे सुरू आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे देखील गेल्या काही दिवसांपासून मावळ मतदार संघात लोकांच्या भेटी-गाठी घेत आहेत. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. तसेच, स्थानिक पदाधिका-यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांना देखील त्यांनी कामाला लागण्याचा संदेश दिला आहे.

शनिवारी (दि. 23) निगडी येथे त्यांनी पक्षाच्या जुन्या जाणत्या पदाधिका-यांची भेट घेतली. त्यावेळी उपस्थित नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधला. चर्चेदरम्यान पार्थ पवार म्हणाले की, गुजरातमध्ये किती विकास झाला, किती नाही, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. असे असताना गुजरातचे मॉडेल देशभरात गाजू शकते. तर, राष्ट्रवादीच्या माध्यमातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे मॉडेल राज्यभर का गाजू शकत नाही?. कार्यकर्त्यांनी जर ठरवलं तर ते सहज शक्य आहे. आपल्याला पिंपरी-चिंचवड आणि बारामती सारखा विकास भविष्यात मावळमध्ये करायचा आहे. तर, त्यासाठी सर्वांनी कामाला लागले पाहिजे, अशी सूचना पवार यांनी केली.

पार्थ पवार म्हणाले की ”मागील काही दिवसांपासून मी या भागात फिरतोय. मला इथल्या जनतेने खूप प्रेम दिलं आहे. संवाद साधताना प्रत्येकाने पवार साहेब आणि अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एवढं जर काम राष्ट्रवादी याठिकाणी करू शकते, तर राज्यभरात का करू शकणार नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button