पिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी युवती संघटनेकडून पार्थ पवार यांचा वाढदिवस साजरा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राष्ट्रवादीच्या महिला युवती अध्यक्षा वर्षा जगताप आणि त्यांच्या सहकारी युवतींनी पार्थ पवार यांचा वाढदिवस मोठ्या आनंदी वातावरणात साजरा केला. धुळवडीनिमित्त पार्थ पवार यांना रंग लावून त्यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले.

रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे शहर राष्ट्रवादीच्या वतीने पार्थ पवार यांच्या वाढदिवसाचे आयोजन केले होते. पक्षाच्या सर्व पदाधिका-यांनी आणि कार्यकर्त्यांनी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. पक्षातील व पक्षाबाहेरील त्यांच्या चाहत्यांनी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

त्यांनीही सर्वांच्या शुभेच्छा आनंदाने स्वीकारल्या. यावेळी राष्ट्रवादीच्या युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप आणि त्यांच्या युवती सहकारी यांनी केक कापला. धुळवडीनिमित्त त्यांना रंग लावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी आकाशात फुगे देखील सोडण्यात आले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button