धुळवडीचा रंग खेळताना आमदारावर गोळीबार, राजकारणात खळबळ
मुंबई – होळीचा सन साजरा करताना भाजपाच्या एका आमदारावर गोळीबार झाला आहे. या हल्ल्यामध्ये आमदार योगेश वर्मा किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने खळबळ उडाली असून उत्तर प्रदेशमधील लखिमपूर येथे ही घटना घडली आहे.
SP Lakhimpur, Poonam: BJP MLA from Lakhimpur, Yogesh Verma was shot at during Holi festivites at the party office. He sustained bullet wounds on his leg. He is being treated at the hospital, he is out of danger. A case has been registered, investigation underway. pic.twitter.com/GqQeMF8nsF
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 21, 2019
होळी सनानिमित्त आज देशभरात रंग खेळले जात आहेत. लखिमपूर येथील भाजपा कार्यालयाच्या परिसरात रंग खेळण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यकर्त्यांमध्ये रंग खेळण्याचा उत्साह वाढत असतानाच भाजपा आमदार योगेश वर्मा यांच्यावर काही अज्ञातांनी गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या पायाला चाटून गेली. या घटनेमुळे घटनास्थळी खळबळ उडाली.
दरम्यान, किरकोळ जखमी झालेले आमदार वर्मा यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर आता धोका टळला आहे. मात्र, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. राजकीय वैमन्यस्यातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.