धनंजय मुंडे यांच्या टिकात्मक ‘ट्विट’ला पंतप्रधान मोदींची ‘कमेंट’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/dhananjay-munde-123-1.jpg)
मुंबई – कॉंग्रेसने आणि राहूल गांधी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केल्याने तो देशभर चर्चेचा विषय बनला आहे. या आरोपांना उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करून ‘मै भी चौकीदार’ ही नवी मोहीम सुरु केली. या मोहिमेची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खिल्ली उडवली आहे. तरीही नरेंद्र मोदी यांनी धनंजय मुंडे यांना धन्यवाद म्हटलं आहे.
वाचा धनंजय मुंडे यांचा ट्विट
धनंजय मुंडे म्हणतात की, हजारो कोटींचा चुना लावून काही घोटाळेबाज देशाबाहेर पळाले. हे सरकार आणि त्यांनी केलेल्या काही करारांमध्ये घोटाळे झाल्याचा संशय आहे. तरीही स्वतःला देशाचे चौकीदार म्हणून घेणारे पंतप्रधान म्हणतात सारं काही आलबेल आहे. त्यांनी असं म्हणून चौकीदारचं काम करणाऱ्या माणसालाच बदनाम केलं आहे. आता चौकीदाराचं काम करणारा माणूसच मोदींना म्हणतो आहे मै भी चौकीदार मुझे बदनाम ना करो…
Thugs are looting national banks, fleeing from country. He is in government making suspicious deals, pretending to be a national chowkidar, saying all is well. He has defamed every chowkidar. The real chowkidar is pleading now, saheb #MainBhiChowkidar mujhe badnaam na karo… pic.twitter.com/GQp7R2e4L1
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 16, 2019
असा ट्विट धनंजय मुंडे यांनी केला. ज्यावर @narendramodi या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून धनंजय मुंडेंना धन्यवाद देण्यात आले आहेत. तुम्ही मै भी चौकीदार या मोहिमेला पाठिंबा दिलात त्याबद्दल तुमचे आभार असं या ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे. या ट्विटचीही धनंजय मुंडे यांनी खिल्ली उडवली आहे.
हे बघा ४० पैसे रोजाने आणलेल्या लावारीसांवर जबाबदारी टाकली की हे असं होते! यांना शालजोड्याने हाणली तरी धन्यवाद म्हणतात😂 मोदी शेठ अशा लोकांवर अवलंबून राहता म्हणून तुमची नाचक्की होते. जरा आवरा स्वतःला सावरा… किती तो मोठेपणा करणार? जरा ट्विट व्यवस्थित वाचाhttps://t.co/ELOyxVcS9S pic.twitter.com/4OHuEmm4KV
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 16, 2019
४० पैसे रोजाने आणलेल्या लावारीसांवर जबाबदारी टाकली की हे असे होतं. यांना शालजोड्याने हाणलं तरीही धन्यवाद म्हणतात. मोदी शेठ अशा लोकांवर अवलंबून रहाता म्हणून तुमची नाचक्की होते. जरा आवरा, स्वतःला सावरा किती तो मोठेपणा करणार? जरा ट्विट व्यवस्थित वाचा असा खोचक सल्ला धनंजय मुंडे यांनी दिला आहे.