Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवार यादी जाहीर; अकोला, सोलापूरच्या जागेचा निर्णय नंतर
मुंबई – लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवार यादी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केली. केवळ ११ मतदारसंघ वगळता, ३७ उमेदवारांची घोषणा आंबेडकर यांनी केली आहे. लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं एमआयएमनं आधीच स्पष्ट केल आहे. परंतु, त्यांना विश्वासात घेऊन मुंबईतील तीन जागांबाबत निर्णय घेतला जाईल, असं आंबेडकर म्हणाले. तसंच, अकोला आणि सोलापूरचा उमेदवारही लवकरच निश्चित होईल, असं त्यांनी सांगितलं. वंचित बहुजन आघाडीच्या यादीत उमेदवाराच्या नावापुढे त्याची जातही नमूद करण्यात आली आहे. सर्वच वंचित घटकांना प्रतिनिधित्व दिल्याचं या यादीत पाहायला मिळतं.