breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
राहूल कलाटे यांची पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी शिवसेना नगरसेवक राहूल कलाटे यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्या राज्य शासनाने हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये शिवसेना-भाजप युतीनंतर शिवसेनेतील काही मातब्बरांना महामंडळावर संधी देण्यात आली आहे.
शिवसेना आणि भाजप युती झाल्यानंतर आता राज्यातील विविध महामंडळांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुणे म्हाडाच्या उपाध्यक्ष पदी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांची नियुक्ती झाली आहे. भाजपचे अमित गोरखे यांची आण्णाभाऊ साठे विकास महामंडळावर अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील दोन सुशिक्षीत तरुणांना महामंडळांवर संधी मिळाली आहे.