Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
चिंचवड गावातील ओव्हरसीज बॅंकेला प्रचंड आग
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिंचवड येथील इंडियन ओव्हरसीज बँकेला आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी रवाना झाले आहे. आग आटोक्यात आणण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिंचवडगाव येथील इंडियन ओव्हरसीज बँकेला आतून आग लागली. याची माहिती बाजुच्या दुकानातील लोकांनी आग्निशामक दलाला दिली. त्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील आग्निशामक केंद्राचे दोन बंब तत्काळ रवाना झाले.
आग्निशामक दलाच्या जवानांनी बँकेचे दरवाजे तोडताच आतून आगीचे लोट बाहेर पडत होते. सर्वत्र धुराचा काळोख पसरलेला होता. जवानांनी उपकरणांच्या सहायाने आतून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही.





