‘शिवसेना-भाजपाची आता मैत्री बघा’ – निलम गो-हे यांनी विरोधकांना सुनावलं
![BJP should ask Standing Committee Chairman to resign - Neelam Gorhe](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Nilam-Gorhe.jpg)
पुणे – साडे चार वर्षात जनतेच्या हितासाठी आम्ही आवाज उठवला. या काळात अनेक वेळा एकमेकांवर टीका झाली. आतापर्यंत भाजप सेनाचा संघर्ष पाहिला. आता मैत्र बघा, अशा शब्दांत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना सुनावले.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वैशाली हॉटेल येथे पुणे कट्टा अंतर्गत शहरातील राजकीय घडामोडीवर चहा आणि इडली सांबर घेत. भाजप सहयोगी खासदार संजय काकडे, शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे, माजी आमदार मोहन जोशी,संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, भाजपचे नेते नगरसेवक मुरलीधर मोहोळ या सर्व नेते मंडळीनी अनेक विषयावर चर्चा देखील केली. या कार्यक्रमाचे आयोजन गणेश सातपुते यांनी केले होते.
यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सेना आणि भाजपमध्ये मतभेद असून देखील हिंदुत्वाच्या व्यापक मुद्द्यावर आमची युती झाली आहे. तसेच आमच्यातील मतभेद मागे ठेवले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत युतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी सर्व शक्तीने प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्या म्हणाल्या की, राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा असून लोकसभेची जरी संधी मिळाली नसली तरी मी राज्यसभेची वाट पाहिली. अशी पुढील राजकीय वाटचालीची भावना त्यांनी व्यक्त केली.