प्रभाग स्विकृत सदस्य पदी सामाजिक कार्यकर्त्यांएेवजी पक्ष कार्यकर्त्यांना संधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/images.jpg)
पिंपरी- महापालिकेवर सत्ताधारी भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे महापालिकेच्या आठ प्रभाग समितीत 24 जागेवर स्वीकृत सदस्य पदी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संधी देवून त्यांना निवडून आणले आहेत. या निवडणूकीत 121 उमेदवार रिंगणात उतरल्याने सदस्य निवड प्रक्रियेत मतदान घेण्यात आले.
प्रभाग निहाय हे नुतन स्विकृत सदस्य
अ – प्रभाग समितीवर राजेश पोपट सावंत, सुनिल मानसिंग कदम, राजेंद्र नामदेव कांबळे
ब – प्रभाग समितीवर बिभीषण बाबु चौधरी, विठ्ठल बबन भोईर, देविदास जिभाऊ पाटील
क – प्रभाग समितीवर वैशाली प्रशांत खाडे, गोपीकृष्ण भास्कर धावडे, सागर सुखदेव हिंगणे
ड – प्रभाग समितीवर चंद्रकांत भूमकर, संदीप नखाते, महेश जगताप
ई – प्रभाग समितीवर अजित बुर्डे, साधना तापकीर, विजय लांडे
फ – प्रभाग समितीवर दिनेश यादव, संतोष भाऊसाहेब मोरे, पांडुरंग गुलाब भालेकर
ग – प्रभाग समितीवर गोपाळ मळेकर, संदीप गाडे, विनोद तापकीर
ह – प्रभाग समितीवर अनिकेत राजेंद्र काटे, कुणाल दशरथ लांडगे, संजय गुलाब कणसे
दरम्यान, सत्ताधारी भाजपने महाराष्ट्र महानगरपालिकांच्या प्रभाग समित्यांमध्ये बिनसरकारी आणि समाजलक्षी संघटना यांचे प्रतिनिधी देताना त्यांचे निकष डावलण्यात आले आहेत. तसेच सामाजिक संस्था असलेल्या परंतू पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी दिल्याने अनेक जून्या कार्यकर्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.