Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे गुरवमधील महादेव मंदिराच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपळे गुरव येथील अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या मंदिराचा स्लॅब कोसळून तीन निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला. आज पिंपरी-चिंचवड महापालिकेने या अनधिकृत मंदिराच्या बांधकामावर कारवाई केली. तीन निष्पाप कामगारांचा बळी गेल्यानंतर पालिका प्रशासनाला या अनधिकृत बांधकामांबाबत जाग आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पिंपळे गुरवच्या स्मशान भूमीजवळ महादेव मंदिराचे बांधकाम गेल्या दीड महिन्यापासून सुरु आहे. मुख्य मंदिराच्या गाभा-याचे बांधकाम संपुष्टात आल्यानंतर मंदिरासमोरच्या सभामंडपाचे काम सुरु होते. बुधवारी मंदिराच्या सभामंडपाच्या भिंती कोसळल्या. यामध्ये दुर्दैवी तिघांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने आज मंदिरावर कारवाई केली. महादेव मंदिराच्या अंदाजे क्षेत्रफळ 1100 चौरस फुटाच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

 

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button