Breaking-newsपिंपरी / चिंचवड
स्वराज्याच्या निर्मितीसाठी शिवरायांचा सर्वसमावेशक विचार आत्मसाद करा – अभिमन्यु पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/IMG-20190220-WA0013.jpg)
पद्यावती महिला ग्रुपतर्फे शिवजयंती उत्साहात
पिंपरी ( महा ई न्यूज ) – सध्या विविध जाती-धर्मामध्ये वाद निर्माण करुन सत्तेची भूक भागविणा-या राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणे गरजेचे आहे. माॅ जिजाऊंनी विविधी जाती-धर्मातील मावळ्यावर शिवबा एवढेच प्रेम करुन त्यांना स्वराज्याची प्रेरणा दिली. अठरापगड जातींना सोबत घेवून महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. एवढेच नव्हे तर आपल्या रयतेला मुलाप्रमाणे सांभाळले असून प्रत्येक मावळा महाराजांसाठी जीव द्यायला तयार होता. त्यामुळे पुन्हा एकदा स्वराज निर्माण करायचे असेल तर शिवरायांचा सर्व समावेशक विचार आत्मसाद करायला हवा, असे प्रतिपादन संभाजी बिग्रेडचे राज्य उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले.
पद्मावती महिला ग्रूप इंद्रायणीनगरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रचंड उत्साहात करण्यात आली. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जिजाऊ शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणूक काढण्यात आली. दीपोत्सव करून शिवजन्मोत्सवाचा पाळणा कार्यक्रम करण्यात आला.
पवार म्हणाले की, देशभरात एक वर्षांच्या मुलीपासुन सत्तर वर्षाच्या वृद्धेपर्यंत कुठलीही महिला सुरक्षित नाही. घराबाहेर एकट्या मुलीला पाठवायला आई-बाप घाबरतात. पण स्वराज्यात स्त्री सुरक्षित तर होतीच, पण तिला सन्मानाचे स्थान होते. रांझ्याच्या पाटलांने एका स्त्रीवर बदअमल केला. तर महाराजांनी त्याचा चौरंगा केला होता. कारण परस्त्रीला मातेसमान मानणारा आपला राजा होता. हा इतिहास आपण आपल्या मुलांना सांगितला पाहिजे. आपल्या मुलांना आपणच स्त्रीचा सन्मान करायला शिकविला. तरच समाजातील प्रत्येक महिला सुरक्षित होवून स्त्री सुरक्षेचा प्रश्नच संपून जाईल. छत्रपती शिवाजी महाराज हे शुन्यातून विश्व निर्माण करणारे पहिले राजे आहेत. त्यामूळे शिवाजी महाराज वाचून नाचण्यापेक्षा त्यांचा इतिहास समजून घेवून तस जगण्याचा प्रयत्न केलात. तर समाजातील सर्वच प्रश्नाचे निराकरण झाल्याशिवाय राहणार नाही. असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यास पद्मा पाटील, अनुराधा पवार, लता गोयल, सुवर्णा दळवी, सीमा धुमाळ, योगिता मुसांडे, किर्ती भिलारे स्नेहल ढेरे, पुनम पाटील,अर्चना पऱ्हाड आदी महिलांनी पुढाकार घेतला.