Breaking-newsमहाराष्ट्र
उदगीरमध्ये राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेचे थाटात उदघाटन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/IMG-20190211-WA0036.jpg)
उदगीर (महा-ई-न्यूज) – उदगीर येथील स्व . सुरमणी पं . रामदासजी अनवले गुरुजी यांच्या स्मृतिनिमित्त आयोजीत राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धचे उदघाटन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईचे अध्यक्ष प्रभाकर भांडारे यांच्या हस्ते झाले.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा भारत लिबर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, प्रमुख पाहुणे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय बनसोडे, प्रा. डॉ. अनया थत्ते मुंबई , किसान शिक्षण प्रसारक मंडाळाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, महात्मा बसवेश्वर कॉलेजचे उपप्राचार्य सुधीर अनवले, प्रा. विजयकुमार धायगुडे, प्रा. वेदांग धाराशिवे, प्रा. शिवरूद्र स्वामी आदी उपस्थीत होते. हा कार्यक्रम शिवाजी महाविद्यालयातील सभागृहामध्ये पार पडला.
प्रभाकर भांडारे म्हणाले, फार चांगला उपक्रम आहे. स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमची गरज आहे. विद्यार्थ्यांना आज झटपट प्रसिद्धी मिळवावी असे वाटत असते. पण ती प्रसिद्धी धोकादायक असते.
प्रा. डॉ. अनया थत्ते म्हणाल्या, पुर्ण अभ्यास अवगत झाल्याशिवाय स्पर्धेला सामोरे जाऊ नये. स्पर्धा ही स्वतःशीच हवी, स्पर्धेमुळे आपल्यातील गुणांना वाव मिळतो.
अॅड गुणवतंराव पाटीले म्हणाले, स्व. अनवले गुरुजीनी 1956 साली संगीत विद्यालयाची सुरुवात केली. अत्यंत बिकट परिस्थितीतुन हे विद्यालय चालवले. या स्पर्धेसाठी लातुर, माजलगाव, भालकी, देगलुर येथील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.
कार्यक्रमाचे प्रस्तावीक प्रा. डॉ. कृष्णा अनवले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. जोगेंद्र सोमवंशी, आकाश बाडगे, रविकांत घोगरे, मच्छिद्र कांबळे, प्रा. भास्कर मोरे, प्रा. श्रीनिवास बिरादार, मनोज गायकवाड, प्रा. कलय्या स्वामी, संजय महापुरे आदींनी प्रयत्न केले. यावेळी संगीतप्रेमीची मोठया संख्येने उपस्थिती होती.