वाकडच्या लॉरेल सोसायटीत सौरऊर्जा व खतनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/IMG-20190203-WA0009-1.jpg)
स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांचे हस्ते उद्घाटन
पिंपरी ( महा ई न्यूज ) – वाकड परिसरात लॉरेल हाैसींग सोसायटीकडून सौरउर्जा प्रकल्प व खतनिर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे स्थायी समिती अध्यक्षा ममताताई गायकवाड आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते रामदास कस्पटे, सोसायटीचे चेअरमन कवलजित कौर सेठी, सेक्रेटरी मनोज कुमार सिन्हा, कमिटी सभासद असिफ जैन, विशाल लाड, अमित मित्तल, प्रतिक ठक्कर व सोसायटीचे सभासद उपस्थित होते.
वाकडच्या लाॅरेल सोसायटीत सौरऊर्जा व खतनिर्मिती प्रकल्पाचा आज (रविवारी) शुभारंभ करण्यात आला. लॉरेल सोसायटीमधील सर्व सभासदांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प पुर्ण झाला. या सौरउर्जा प्रकल्पामुळे सोसायटीची ७५ टक्के वीज बचत झाली आहे. तसेच खतनिर्मिती प्रकल्पही सोसायटीत राबविला असून १०० टक्के कचऱ्याची विल्हेवाट स्वतः लावत आहेत. या प्रकल्पाबद्दल सर्व सभासदांचे स्थायी सभापती ममता गायकवाड यांनी अभिनंदन केले.