नेट्समध्ये नवख्या शुभमन गिलने केली फटकेबाजी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Shubhaman-Gill.jpg)
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकली. या विजयानंतर भारतीय संघ न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी ऑकलंडमध्ये दाखल झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ किवींच्या देशात पाच एकदिवसीय आणि तीन टी२० सामने खेळणार आहे. २३ जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.
२०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यातच कॉफी विथ करण या शी मध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत विजय शंकर व शुभमन गिल या दोघांना चमूत स्थान मिळाले आहे. यापैकी शुभमन गिल हा नेट्समध्ये सराव करताना दिसला. नेट्समध्ये देखील त्याने गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली. त्याचा हा व्हिडीओ BCCI ने ट्विट केला आहे.
दरम्यान, कोहलीच्या ‘अंतिम ११’च्या संघात कोणते खेळाडू असतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.