प्रभारी अतिरिक्त आयुक्त पदावर दिलीप गावडे यांची वर्णी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/दिलीप-गावडे.jpg)
आयुक्तांचा आदेश ः महापालिका अधिका-यांमध्ये कामकाजाचे खांदेपालट
पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय व क्षेत्रीय कार्यालय स्तरावर प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सहाय्यक आयुक्त संवर्गातील अधिका-यांकडे नव्याने पदभार सोपविण्यात आले आहेत. यामध्ये सह आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार सोपविण्यात आला, तर सहाय्यक आयुक्त अधिका-यांना नव्याने विभाग निहाय कामकाजाचे वाटप करण्यात आले आहे. त्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.
शासन निर्णयान्वये राज्यातील महानगगरपालिकांचे सुधारित वर्गीकरण करणेत आले आहेत. महानगरपालिकेचे ब वर्गामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 39-ए मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यात महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण करण्यात आले आहे. त्यानूसार महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवरील आणि अधिका-यांमधील पदोन्नती अशी दोन पदे निर्माण करण्यात आलेली आहेत. यात महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अतिरिक्त आयुक्त दोन्हीही पदे रिक्त आहेत. मात्र, शासन प्रतिनियुक्तींचे अतिरिक्त आयुक्त पद हे सहाय्यक आयुक्त डॅा प्रवीण आष्टीकर यांचे प्रभारी म्हणून सोपविली आहे. तसेच महानगरपालिका स्तरावरील अतिरिक्त आयुक्त पद हे सह आयुक्त दिलीप गावडे यांचेकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविली आहे.
महानगरपालिकेत एकूण 11 सहाय्यक आयुक्त पदे कार्यरत आहेत. त्यातील प्रतिनियुक्तीचे सहा आणि महापालिकेचे पाच अधिका-यांचा समावेश आहे. परंतू त्यातील तीन सहाय्यक आयुक्त पदे अद्याप प्रभारी म्हणून इतराकडे सोपविलेले आहे. महानगरपालिका मुख्य कार्यालय व क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाजाचे नियोजन योग्य पद्दतीने व्हावे, याकरिता आयुक्तांनी कामकाजाचे फेरवाटप केलेले आहेत. यामध्ये डॅा महेशकुमार डोईफोडे, डॅा प्रवीण आष्टीकर यांच्या कार्यभारात काहीच बदल केलेले नाहीत. डॅा महेश डोईफोडे यांच्याकडे (प्रशासन, स्थानिक संस्था कर व माहिती व जनसंपर्क विभाग), डॅा.प्रवीण आष्टीकर यांच्याकडे (मध्यवर्ती भांडार, निवडणूक विभाग), आशादेवी दुरगुडे यांच्याकडून अ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार काढून त्यांना (सुरक्षा विभाग व आपत्ती व्यवस्थापन), तर चंद्रकांत इंदलकर यांच्याकडून इ क्षेत्रीय कार्यालयाचा कारभार काढून त्यांच्याकडे (झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन, कामगार कल्याण विभाग), विजय खोटारे यांच्याकडून भूमी व जिंदगी विभाग काढून ( ड क्षेत्रीय कार्यालय व आकाशचिन्ह व परवाना विभाग), बारामतीच्या नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांना महापालिकेत अ क्षेत्रीय कार्यालय, भूमि व जिंदगी विभाग सोपविला आहे. तर उदगीरच्या नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांना महापालिकेत ई क्षेत्रीय कार्यालय, क्रीडा विभाग सोपविला आहे. मनोज लोणकर यांच्याकडे आरोग्य कार्यकारी अधिकारी आणि फ क्षेत्रीय कार्यालय अतिरिक्त कारभार सोपविले आहे. तसेच प्रभारी सहाय्यक म्हणून आण्णा बोदडे यांच्याकडे क क्षेत्रीय अधिकारी तर संदीप खोत यांच्याकडे ब क्षेत्रीय अधिकारी आणि आशा राऊत यांच्याकडे ह क्षेत्रीय अधिकारी यांचेकडे अतिरिक्त पदभार सोपविला आहे. या आदेशाची अमंलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी दिले आहेत.