Uncategorized
काँग्रेस खासदारांचं संसदेच्या छतावर चढून आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/congrress.jpg)
अॅट्रॉसिटी अॅक्ट, कावेरी वाद आणि इराकमध्ये भारतीयांची हत्या आदी मुद्द्यांवर विरोधकांनी संसदेत गदारोळ केला. यामुळं लोकसभेचे कामकाज बुधवारपर्यंत स्थगित करण्यात आले. तत्पूर्वी काँग्रेस खासदारांनी इराकमध्ये मारल्या गेलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. पंजाबमधील काँग्रेसचे तीन खासदार संसदेच्या छतावर चढले आणि हातात फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, सरकारने इराकच्या मोसुल भागात आयएसच्या दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आलेल्या ३९ भारतीयांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.