Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकड, पिंपळे निलख भागातील रहिवाशांचा महापालिकेवर मोर्चा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – वाकड, पिंपळे निलख भागात नागरिकांना वेळेवर सुविधा मिळत नाहीत. वेळोवेळी पाठपुरावा करूनही अधिकारी नगरसेवकांच्या विनंतीला मान देत नसल्याने पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने शनिवारी (दि. 19) महापालिकेवर निषेध मोर्चा काढण्यात आला. सुविधा पुरविल्या नाहीत तर या वर्षाचा मिळकत कर भरणार नाही, असा इशारा या भागातील रहिवाशांनी दिला आहे.

नगरसेवक मयुर कलाटे, सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे, सुदेशराजे देशमुख, तेजस्वीनी ढोमसे, सुधीर देशमुख, सचिन लोंढे यांचा आंदोलनात सहभाग होता. हिंजवडीतील आयटी कंपन्यांमधील हजारो आयटीयन्स वाकड आणि विशालनगर परिसरात राहतात. या परिसरातून महापालिकेच्या करसंकलन विभागाला 87 ते 90 कोटींचा महसूल मिळतो. तरीदेखील गेल्या अनेक वर्षांपासून वाकड आणि पिंपळे निलख भागात नागरी सुविधांची वाणवा आहे. पाणी टंचाईमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. या उच्चभ्रू परिसरातील सोसायट्यांमधून गोळा केला जाणारा ओला आणि सुका कचरा पुन्हा एकत्र केला जातो. त्याची नेमकी कशाप्रकारे विल्हेवाट लावली जाते, याची वारंवार मागणी करूनही माहिती दिली जात नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

त्यामुळे आयटीयन्सनी पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून महापालिकेवर धडक मारली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर समस्यांचा पाडा वाचला. महापालिका नागरी सुविधा देत नाही. पाणी देत नाही, कचरा उचलला जात नाही. मग, आम्ही कर का? भरायचा असा संतप्त सवालही त्यांनी आयुक्तांना केला. त्यावर आयुक्‍त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”शहरातील पाण्याचा प्रश्‍न मिटविण्यासाठी महापालिकेला आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातील हक्काचे राखीव कोट्यातील पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल. तसेच या प्रश्नांबाबत दहा दिवसांनी बैठक घेतली जाईल”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button