Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी गावात कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी दागिने केले लंपास
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/theft_20180585218.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून 64 हजाराचे दागिने आणि दहा हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना रविवारी (दि. 13) सकाळी सातच्या सुमारास पिंपरी गावात उघडकीस आली.
सचिन रामचंद्र वाईकर (वय 29, मोनिका टिचर्स हौसिंग सोसायटी, भैरवनाथनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाईकर हे शनिवारी (दि. 12) रात्री घरी नव्हते. या संधीचा मोका साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटला. घरातील 65 हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम 10 हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.