महापौर चषक ‘टेबल टेनिस’ स्पर्धा 11 जानेवारीपासून
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/700_.jpg)
पुणे -पुणे महानगर पालिका आणि पुणे जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 13 जानेवारी या काळात डेक्कन जिमखाना मैदानावर महापौर चषक टेबल टेनिस स्पर्धा आयोजित होणार आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार असून प्रत्येक संघामध्ये 1 मुख्य प्रशिक्षक, 1 संघ व्यावस्थापक, 11 खेळाडू आणि 1 किंवा 2 मेंटॉर असणार आहेत.
स्पर्धेचा उद्धघाटन सोहळा डेक्कन मैदानावरच पार पडणार आहे. महापौर चषक टेबल टेनिस स्पर्धेचे पूर्ण आयोजन पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना करणार असून त्यामध्ये वेगवेगळ्या 9 विभागात ही स्पर्धा पार पडणार आहे.
या स्पर्धेत पुण्यातील काही नावाजलेले खेळाडू पृथा वार्तिका, सनत बोकील, जान्हवी फणसे, गौरव लोहपात्रा वेदांग जोशी, वैभवी खेर, राधिका सकपाल, साक्षी पवार, रजत कदम, वैभव दहीभाते, अर्चना आपटे, नील मुळे, ईशा जोशी हे या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तर, अनिकेत कोपरकर, शुभंकर रेणावीकर, अद्वैत ब्रह्मे, रोहित चौधरी, सुनील बाब्रास, उपेंद्र मुळे अजय कोठावळे हे माजी खेळाडूदेखील या स्पर्धेत सहभाग नोंदवणार आहेत.