Breaking-news

पाच वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरोपी अटकेत

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना औंध येथे एका सार्वजनिक शौचालयात घडली.

याप्रकरणी पीडित ५ वर्षीय चिमुकलीच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, उमेश उर्फ पप्पु रविंद्र सरकनीया (वय ३१) या नराधमला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश याने पीडित ५ वर्षीय चिमुलीसोबत औंध येथील सार्वजनिक शौचालयात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पीडितेची आईतेथे पोहचली यामुळे मोठा अनर्थ टळला. यावर पीडितेच्या आईने उमेशला याचा जाब विचारला असता त्याने कोयत्याचा धाक दाखवून पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे सुरुवातीला त्यांनी पोलीसात तक्रार केली नव्हती. मात्र बुधवारी (दि.१९) सांगवी पोलीसात त्यांनी तक्रार दिली. आणि पोलीसांनी तातडीने आरोपी उमेश याला बेड्या ठोकल्या. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button