Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
नक्षलवादी हे ‘आयएस’च्या दहशतवाद्यांसारखेच; देशभरात संतापाची लाट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/04/elebrities.jpg)
नवी दिल्ली: छत्तीसगडमधील सुकमा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भयंकर नक्षलवादी हल्ल्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वसामान्य जनतेबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. इस्लामिक स्टेटचे दहशतवादी आणि नक्षलवाद्यांमध्ये काहीच फरक नाही. यांना दयामाया दाखवू नये, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
ट्विटरच्या माध्यमातून दिग्गजांनी नक्षलवाद्यांबद्दलच्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. लेखिका तस्लिमा नसरीन यांनी नक्षलवाद्यांची तुलना ‘इस्लामिक स्टेट’च्या दहशतवाद्यांशी केली आहे.