breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
कडाक्याच्या थंडीत गोरगरीबांना चादरीची ऊब देण्यास आयुक्तांची आडकाठी
स्थायी, महासभेची मंजूरी मिळूनही प्रशासनाची आडकाठी का?
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गोरगरीब, वंचित, दुर्लक्षित घटकांना सोयी-सुविधा पुरविण्याची जबाबदारी आहे. त्यानूसार सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने प्रत्येक दोन ब्लॅंकेट, चादर, बेडशीट व दरी पंजाचा संच मोफत देण्याचा प्रस्तावास तीन महिन्यापुर्वी मान्यता दिली. तसेच स्थायी समिती व महासभेत त्या प्रस्तावाला मान्यता दिली. परंतू, महापालिका नागरवस्ती विभागासह आयुक्तांच्या अडकाठीमुळे गोरगरीबांना कडाक्याच्या थंडीत चादरीची ऊब मिळण्यास विलंब लागत आहे.
मुंबई महानगरपालिका अधिनियम ६६ नूसार शहरातील झोपडपट्टीवासीयांना सोयी-सुविधा पुरविण्याची जबाबदारी आहे, त्यानूसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातील महिला व बालकल्याण लेखार्शिकातून महिला व बालकल्याण समितीने ०४ सप्टेंबर २०१८ रोजी झोपडपट्टीतील महिलांना व कुष्ठरोग्यांना मोफत साहित्य देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येकी २ चादर, २ ब्लॅंकेट, २ दरी पंजा आणि २ बेडशीट असा मोफत संच वाटप करण्याचा ठराव करुन मान्यता देण्यात आली. याबाबत शहरातील सुमारे ५० हजार महिलांना लाभ होणार आहे. त्याला स्थायी समिती व महापालिका सर्वसाधारण सभेनेही मजुंरी दिली.
महानगरपालिका प्रशासनाने मोफत चादर, ब्लॅंकेट वाटपास विलंब लावला आहे. सदरील प्रस्ताव आयुक्तांनी कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे अत्यंत अन्यायकारक, असंवेदनशील वर्तन दर्शविणारी आहे. याविषयी महानगरपालिका आयुक्तांनी त्वरित जलदगतीने कारवाई करून साहित्याचे वाटप गरजूंना वाटप करावे, वंचित व पिडीत नागरीकांच्या आरोग्यास आवश्यक असणा-या या साहित्याच्या वाटपावर वेळेत काम करण्याऐवजी मोठ-मोठ्या महत्वकांक्षी प्रकल्पांची स्वप्ने नागरिकांना दाखविणे अयोग्य व अशोभनीय आहेत.
दरम्यान, शहरातील गोरगरीब व गरजू महिलांना त्वरीत ब्लॅंकेट, चादर, बेडशीट वाटप करुन कडाक्याच्या थंडीपासून वाचविण्यास मदत करावी, अशी मागणी होवू लागली आहे.