Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘महाराष्ट्र केसरी’स्पर्धेसाठी संतोष नखाते, किशोर नखाते यांची निवड

–  जयराम नढे यांचा ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सत्कार
पिंपरी ( महा ई न्यूज ) – जालना येथे होणा-या 62 व्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवडमधून माती विभागातून पै. संतोष नखाते आणि गादी विभागातून पै. किशोर नखाते यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी जयराम नढे यांना जीवन गाैरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. 
पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघ व कै.हनुमंतराव तापकीर प्रतिष्ठान यांच्या वतीने काळेवाडीत कुस्तीपटूंची निवड चाचणी घेण्यात आली. यावेळी  राज्य कूस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, आमदार महेश लांडगे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी, ऑलिंम्पिकवीर पै. मारुती आडकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, उद्योजक शंकर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी खुल्या गटात माती विभागातून पै. संतोष सुरेश नखाते याने पै. शाह फैझल कुरेशी याला चितपट केले. तर गादी विभागात पै. किशोर हिरामण नखाते याने पै. प्रमोद मांडेकर याच्यावर विजय मिळविला.  तसेच जानेवारी 2019 ला मुंबईत होणाऱ्या सीएम चषकसाठी पै. किशोर नखाते व पै. प्रसाद सस्ते यांची निवड झाली.
विजेत्या मल्लांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, ट्रॅकसुट बक्षिस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेस पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही विजेत्या पैलवानांना सह्याद्री कूस्ती संकुलचे वस्ताद विजय बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button