breaking-newsआंतरराष्टीय

…तोपर्यंत पाकिस्तानला एक डॉलरपण देता कामा नये – निक्की हॅले

पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद्यांना मदत करत आहे, तोपर्यंत त्यांना एक डॉलरपण मदत देता कामा नये, अशा शब्दांत अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅले यांनी सुनावले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना खतपाणी घालते आणि हेच दहशतवादी अमेरिकन सैनिकांचा जीव घेतात. अशावेळी वॉशिंग्टनमधून इस्लामाबादला एक डॉलरही मदत दिली जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळवणाऱ्या निक्की हॅले या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत. अमेरिकेलाच धोकादायक ठरु शकणाऱ्या देशांना मदत करुच नये, असे त्या म्हणाल्या.

एखाद्या देशाबरोबर संबंध वाढवायचे किंवा त्यांच्याबरोबर एखाद्या गोष्टीवर काम करायचे याची व्यूहरचनाच असली पाहिजे. त्याप्रमाणेच पुढे गेले पाहिजे. एखाद्या देशाला डोळे झाकून, कोणताही विचार न करता मदत करणे धोक्याचे ठरु शकते, असे हॅले यांनी अमेरिकेतील ‘द अटलांटिक’ नियतकालिकेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

पाकिस्तानचे उदाहरण देत त्या म्हणाल्या, पाकिस्तानला कोट्यवधी डॉलरची मदत केली जाते आणि ते दहशतवाद्यांना रसद पुरवतात. हेच दहशतवादी अमेरिकन सैन्यांना ठार मारतात. जोपर्यंत ते या कार्यशैलीत बदल करत नाहीत. तोपर्यंत त्यांना आर्थिक मदत केलीच जाऊ नये, असे त्या म्हणाल्या.

मला वाटत नाही की, त्यांना डोळे बंद करुन मदत करावी आणि त्यांच्याकडून सद्भावनेची अपेक्षा करावी. जेव्हा त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी घडतील तेव्हाच त्यांना मदत केली जावी, असे त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तानला आर्थिक मदत करण्यावरुन फटकारले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button