Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘अमोल कोल्हे तुम्ही कसे जिंकता तेच पाहू’; संजय राऊतांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा

मुंबई | संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात (३० नोव्हेंबरपासून लोकसभा आणि २ डिसेंबरपासून राज्यसभा) सादर होणाऱ्या लोकसभा मतदारसंघ फेररचना घटनादुरुस्ती विधेयकावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून पाठिंबा मिळण्याचे संकेत मिळाल्यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या पक्षावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. तसेच, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या विरोधात थेट उमेदवार देण्याचा आणि खासदार अमोल कोल्हे यांना शिरूरमधून पाडण्याचा थेट इशारा राऊत यांनी दिला आहे.

मतदारसंघ फेररचना विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष पाठिंबा देणार असल्याची माहिती नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. मात्र, त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आव्हाड यांचा हा दावा खोडून काढला. पक्षाच्या या संभ्रम निर्माण करणाऱ्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आपला संताप व्यक्त केला.

केंद्र सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या संभाव्य भूमिकेवर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राशी झालेली बेईमानी ही या राज्यातील मराठी माणूस सहन करणार नाही. १५०-१५० कोटींना खासदार विकले गेले आहेत. मी हे अतिशय जबाबदारीने बोलत आहे. अमित शाह यांनी राष्ट्रीय घोडेबाजार स्टॉक एक्सचेंज स्थापन केला असून त्यांच्या शेअरला १५० कोटींचा भाव आहे. खासदार विकले जात आहेत, हे या देशाचे दुर्दैव आहे.

हेही वाचा

National Sport Climbing । पिंपळे सौदागरमध्ये राष्ट्रीय स्पोर्ट्स क्लायम्बिंगचा थरार!

महाराष्ट्र द्रोही आणि देशद्रोही अशा या विधेयकाला पाठिंबा देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केल्याचे दिसून येत आहे. हे चुकीचे आहे आणि त्याचे समर्थन कोणीही करणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेला हे पसंत नाही. आमचाही पक्ष फोडला, पण आम्ही शरण गेलो नाही; कारण पक्ष फुटण्यापेक्षा देश महत्त्वाचा आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांचा राष्ट्रवादीला इशारा

शिरूर लोकसभा मतदारसंघासह बहुसंख्य मतदारसंघांत शिवसेना (ठाकरे) पक्षाचा प्रभाव आहे. शिवसेनेशिवाय तुम्ही तिथे जिंकू शकत नाही, हे मी अमोल कोल्हे यांना सांगू इच्छितो. आता आम्ही सर्व जागा लढणार आहोत, मग अमोल कोल्हे तुम्ही कसे जिंकता तेच आम्ही पाहतो. सोलापूर किंवा माढा यांसारख्या अनेक मतदारसंघांत आमची ताकद आहे. आम्ही थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात उमेदवार देऊन लढू आणि महाराष्ट्र काय आहे ते दाखवून देऊ, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group