ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पीसीसीओईआरचे संशोधन रस्ते वाहतूक अपघात प्रसंगी उपयोगी – इंडियन रोड्स काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. के. एस. कृष्णा रेड्डी

हैदराबाद येथील इंडियन रोड्स काँग्रेसच्या ८५ व्या राष्ट्रीय वार्षिक अधिवेशनात पीसीसीओईआरचे कौतुक

पिंपरी, पुणे : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे सचिव विठ्ठल काळभोर हे स्वतः अभियांत्रिकी क्षेत्रातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी काम करतात, त्यांच्या अभिनव संकल्पनांवर आधारित ‘व्हेईकल क्लास बेस्ड सिक्वेन्शियल यू-टर्न जिओमेट्री’ आणि ‘स्ट्रिक्टली सेग्रिगेटेड मल्टी-डेक अर्बन ब्रिजेस’ या दोन प्रकल्पांच्या तांत्रिक विश्लेषणाची राष्ट्रीय व्यासपीठावर कौतुकास्पद नोंद घेतली गेली. तसेच पीसीसीओईआरचे संचालक डॉ. हरीश तिवारी यांच्या नेतृत्वात कार्यरत असणारे पीसीसीओईआरचे डीन आर. अँड डी. डॉ. सुदर्शन बोबडे यांची ‘स्मार्ट घाट रोड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टिम’ ही अभिनव संशोधन संकल्पना देखील वाहनांच्या अपघात प्रसंगी खूप उपयोगी ठरेल असे प्रतिपादन इंडियन रोड्स काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा कर्नाटक सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव डॉ. के. एस. कृष्णा रेड्डी यांनी केले.

इंडियन रोड्स काँग्रेसचे (आयआरसी) ८५ वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन नुकतेच हैदराबाद येथे संपन्न झाले. यामध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च च्या संशोधनाचे राष्ट्रीय स्तरावर मोठे कौतुक करण्यात आले. पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांच्या वाहतूक व्यवस्थापनावरील दोन अभिनव अभियांत्रिकी संकल्पना आणि डॉ. बोबडे यांची घाटरस्ते सुरक्षेवरील संशोधन याचे संयुक्तपणे सादरीकरण डॉ. तिवारी व डॉ. बोबडे यांनी केले. या सादरीकरण सत्राचे अध्यक्ष डॉ. के. एस. कृष्णा रेड्डी यांनी घाट रस्ते सुरक्षा, यू-टर्न व्यवस्थापन आणि मल्टी-डेक ब्रिज संकल्पनांचे विशेष कौतुक केले.
हैदराबाद येथील हायटेक प्रदर्शन केंद्र येथे झालेल्या अधिवेशनातील तांत्रिक सत्र क्रमांक २ (शैक्षणिक क्षेत्रासाठी) मध्ये ‘सुरक्षित घाट रस्ते आणि भारतातील शहरी वाहतूक व्यवस्थापनासाठी स्मार्ट वाहतूक प्रणाली’ या विषयावर पीसीसीओईआर च्या वतीने सविस्तर तांत्रिक विवेचन करण्यात आले.

यावेळी या सत्राचे अध्यक्ष इंडियन रोड्स काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा कर्नाटक सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव डॉ. के. एस. कृष्णा रेड्डी होते. सह-अध्यक्ष सीएसआयआर व वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ. मुक्ती अडवाणी, आयआयटी मुंबई, आयआयटी रोपार, आयआयटी कानपूर, आयआयटी हैदराबाद आणि एनआयटी वारंगल यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांतील संशोधक, प्रतिनिधी उपस्थित होते. यांच्या समोर पीसीसीओईआर च्या संशोधनाला सादरीकरणासाठी मिळालेली संधी अभिमानाची बाब ठरली.
पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांच्या ‘व्हेईकल क्लास बेस्ड सिक्वेन्शियल यू-टर्न जिओमेट्री’ आणि ‘स्ट्रिक्टली सेग्रिगेटेड मल्टी-डेक अर्बन ब्रिजेस’ या दोन संकल्पनांद्वारे शहरांमधील चौकात अवजड वाहनांच्या यू-टर्नमुळे होणारी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांब रांगा आणि सुरक्षेचे प्रश्न लक्षात घेऊन वाहनांच्या वर्गानुसार स्वतंत्र यू-टर्न मार्गांचा पर्याय मांडण्यात आला आहे. हलक्या वाहनांसाठी आतील वळण मार्ग, तर अवजड वाहनांसाठी अधिक रुंद बाहेरील वळण मार्ग अशी व्यवस्था केल्यास वाहतुकीतील अडथळा कमी होऊन चौक अधिक सुरक्षित व वाहतूक सुरळीत होण्यास मदत होऊ शकते. वाढत्या शहरी वाहतुकीवर उपाय म्हणून वाहनांच्या प्रकारानुसार स्वतंत्र स्तरांवर वाहतूक विभागण्याची ‘स्ट्रिक्टली सेग्रिगेटेड मल्टी-डेक अर्बन ब्रिजेस’ ही संकल्पना मांडण्यात आली. उन्नत स्तरावर हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र पूल, त्याखाली अवजड वाहने व ट्रकसाठी स्वतंत्र मार्ग, तर जमिनीवरील सेवा रस्त्यांवर दुचाकी, तीनचाकी, स्थानिक बस व कमी अंतराच्या वाहतुकीसाठी व्यवस्था, असे या संकल्पनेचे स्वरूप आहे. संरचनात्मक विश्लेषणानुसार लाईव्ह लोड मोमेंटमध्ये अंदाजे ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत घट आणि अधिसंरचनेच्या बांधकाम खर्चात ३५ ते ४५ टक्क्यांपर्यंत बचतीची शक्यता या अभ्यासातून अधोरेखित झाली आहे.

हेही वाचा –  संविधानाचा सन्मान अन् शहीदांच्या बलिदानाचे स्मरण!

पीसीसीओईआर चे डीन आर अँड डी डॉ. सुदर्शन बोबडे यांनी ‘स्मार्ट घाट रोड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टिम’ ही अभिनव संशोधन संकल्पना मांडली. यामध्ये घाटरस्ते सुरक्षेसाठी स्मार्ट तंत्रज्ञान सादर केले. भारतीय घाट रस्त्यांवरील तीव्र वळणे, अरुंद रस्ते, भूस्खलन, अपुरी दूरसंचार व्यवस्था आणि अपघातानंतर वाहनाचा शोध घेण्यात होणारा विलंब या समस्यांवर उपाय मांडले. यामध्ये सौर व पवन ऊर्जेवर चालणाऱ्या स्मार्ट आयओटी पोल्सच्या माध्यमातून धोकादायक घाट वळणांवरील वाहनांचे निरीक्षण, माहिती संकलन आणि आपत्कालीन संदेश वहनाची एकात्मिक व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव डॉ. बोबडे यांनी यात मांडला आहे, तसेच जीआयएस, एआय आणि आयओटी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घाट रस्त्यांवरील सुरक्षेला अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न या संशोधनातून करण्यात आला आहे. यातील ‘टीआयव्हीए – टाइम – बाउंड इंटेलिजंट व्हेईकल अकाउंटेबिलिटी सिस्टिम’ ही संकल्पना विशेष महत्त्वाची आहे. जीआयएस आधारित धोकादायक ठिकाणांची ओळख, एएनपीआर कॅमेऱ्यांद्वारे वाहन क्रमांकाची स्वयंचलित नोंद आणि निर्धारित वेळेनुसार वाहनांचा मागोवा घेणे अशी या प्रणालीची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. एखादे वाहन निर्धारित वेळेत पुढील निरीक्षण केंद्रावर पोहोचले नाही, तर स्वयंचलित अलर्ट निर्माण करून वाहनाचा शेवटचा ज्ञात ठावठिकाणा शोधण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे अपघातग्रस्त किंवा दुर्गम भागात अडकलेल्या वाहनांच्या शोध व बचाव कार्याला गती मिळू शकते. अंबेनळी घाटासारख्या धोकादायक घाट मार्गांवर या प्रणालीचा प्रायोगिक वापर करण्याची संकल्पनाही यात सुचवण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्तरावरील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी पीसीसीओईआरचे संचालक डॉ. हरीश तिवारी व डीन आर अँड डी डॉ. सुदर्शन बोबडे यांचे अभिनंदन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group