Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्यात वाढ; नोव्हेंबरपासून नवे निकष लागू

७ निकष पूर्ण केल्यास १,४०० व ७०० रुपये; सर्व १० निकष पूर्ण करणाऱ्यांना २,००० व १,००० रुपये भत्ता

मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या दरमहा प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये महिला व बालविकास विभागाने सुधारणा केली आहे. अधिकाधिक सेविका आणि मदतनीस या भत्त्यासाठी पात्र ठराव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, सुधारित निकष नोव्हेंबर २०२६ पासून लागू झाले आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

राज्यात १ लाख १० हजार ६६४ अंगणवाड्या असून, १ लाख ८ हजार ६२७ अंगणवाडी सेविका आणि १ लाख ५ हजार ४७० मदतनीस कार्यरत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सेविका आणि मदतनीस यांचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जातो.

हेही वाचा –  दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये; १५ लाख विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

या भत्त्याच्या निकषांमध्ये सर्वसमावेशकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंगणवाडी केंद्रांसाठी निर्धारित १० निकषांपैकी किमान सात निकष पूर्ण करणाऱ्या सेविकांना दरमहा १,४०० रुपये, तर मदतनीसांना ७०० रुपये भत्ता मिळणार आहे. सर्व १० निकष पूर्ण केल्यास सेविकांना २,००० रुपये आणि मदतनीसांना १,००० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. सात ते दहा निकषांच्या पूर्ततेनुसार भत्त्याची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्याच्या शहरी भागापासून अतिदुर्गम भागापर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहेत. अधिकाधिक सेविका आणि मदतनीस भत्त्यासाठी पात्र ठरून त्यांना कामासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group