डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी येथे आंतरराष्ट्रीय पुरुष दिन उत्साहात साजरा

पिंपरी-चिंचवड । आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’ महिला सहकाऱ्यांच्या वतीने महाविद्यालयातील पुरुष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी उत्साहात साजरा करण्यात आला.
यावर्षीची “A Future is Everyone” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात पुरुष सहकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा देऊन करण्यात आली. यानिमित्ताने विविध नाविन्यपूर्ण व मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे महाविद्यालयातील सर्व सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.
प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी आपल्या मनोगतात महिला सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पुरुष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पुरुष दिन साजरा केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमधून स्त्री-पुरुष समानता, परस्पर सन्मान आणि सहकार्याचा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचतो, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘एसपीपीयू स्टार्टअप टॉक सिरीज – २.०’ उत्साहात संपन्न.
प्रा. डॉ. काटेदेशमुख व प्रा. डॉ. वैभव वैद्य यांनी सर्व पुरुष सहकाऱ्यांच्या वतीने या सुंदर उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल महिला सहकाऱ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे नियोजन उपप्राचार्या डॉ. शिल्पा चौधरी , प्रा. अबोली मराळे, प्रा. पूनम मुळे, प्रा. तेजश्री देवकुळे तसेच महाविद्यालयातील महिला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. गार्गी धनेश्वर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व महिला सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.




