Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

क्रिकेट महोत्सवात चुरशीच्या लढती, विजेत्या संघांचा गौरव

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

– कमलेश वाळके व मित्र परिवाराचा पुढाकार, स्थानिक खेळाडूंना कौशल्य दाखवण्याची संधी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

मैदानावरील चुरशीच्या लढती आणि क्रिकेटप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट महोत्सवाची सांगता झाली. कमलेश वाळके आणि त्यांच्या मित्र परिवाराने १२ ते २२ नोव्हेंबरदरम्यान या महोत्सवाचे आयोजन केले होते. सांगता सोहळ्यास आमदार लांडगे उपस्थित होते. यावेळी विजेत्या संघांसह विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

महोत्सवात स्थानिक खेळाडूंना स्पर्धात्मक वातावरणात आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. सामन्यांमधील चुरस आणि खेळाडूंच्या उत्साहाला क्रिकेटप्रेमींनीही उत्स्फूर्त दाद दिली.

हेही वाचा –  पिंपळे सौदागरच्या विकासात नवा ‘प्रकाश’; कुणाल आयकॉन रोडवर अँटिक पथदिव्यांचा प्रयोग

स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या अशा स्पर्धांमुळे नव्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळते आणि शहराच्या क्रीडा संस्कृतीला बळ मिळते, असे मत आमदार लांडगे यांनी व्यक्त केले. खेळाडूंच्या मेहनतीला मिळालेली दाद त्यांच्या पुढील वाटचालीस प्रेरणा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि महोत्सवाच्या आयोजनाबद्दल कमलेश वाळके व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“स्थानिक क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची आणि चुरशीच्या सामन्यांचा अनुभव घेण्याची संधी मिळावी, या उद्देशाने आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा क्रिकेट महोत्सव आयोजित केला. खेळाडूंनी जिद्दीने खेळ केला आणि क्रिकेटप्रेमींनीही त्यांना भरभरून दाद दिली. या स्पर्धेतून मिळालेला अनुभव तरुण खेळाडूंना पुढील वाटचालीत उपयोगी पडेल, असा विश्वास आहे.”

– कमलेश वाळके, आयोजक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group