TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पंढरपूर दौऱ्यानंतर परतीचा प्रवास रखडला

कार्तिक यात्रेच्या तयारीची पाहणी केल्यानंतर परतीच्या प्रवासाची तयारी सुरू असतानाच प्रकार; बिघाडाचे कारण अद्याप अस्पष्ट

पंढरपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर होते. कार्तिक यात्रेच्या तयारीची पाहणी केल्यानंतर ते परतीच्या प्रवासासाठी रवाना होणार होते. मात्र, प्रवासाला निघण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले.

या घटनेमुळे काही काळ प्रशासनाची धावपळ उडाली. हेलिकॉप्टरमधील बिघाड नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बिघाड दूर करण्यासाठी हेलिकॉप्टरची तांत्रिक तपासणी सुरू असल्याची माहिती आहे.

हेही वाचा –  गोकुळ दूध उत्पादकांना दिलासा! म्हशीच्या दूध खरेदी दरात ३ रुपयांची वाढ; विक्री दरही ६ रुपयांनी महागणार

दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे एकनाथ शिंदे यांचा परतीचा प्रवास काही काळ रखडला. हेलिकॉप्टरची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रवासाबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group