Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कात्रज डेअरी चौकातील वाहतुकीत १९ नोव्हेंबरपासून बदल

स्वारगेटकडून कात्रज चौकाकडे जाणारा राईट टर्न बंद; वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

पुणे | स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो मार्गाच्या कामासाठी कात्रज मुख्य चौकातील जड वाहतूक वळविण्यात आली आहे. या कामाच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी कात्रज डेअरी चौकातील वाहतुकीत १९ नोव्हेंबर २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत बदल करण्यात आले आहेत.

त्यानुसार, स्वारगेटकडून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील कात्रज डेअरी चौकातील उजवे वळण (राईट टर्न) बंद करण्यात आले आहे. स्वारगेटकडून बालाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी चौकाच्या २५० मीटर अलीकडे, तर सरहद चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी चौकाच्या २५० मीटर पुढे यू-टर्न घ्यावा.

हेही वाचा

चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

तसेच सरहद चौकाकडून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी कात्रज डेअरी चौकातून डावीकडे स्वारगेटच्या दिशेने वळून १०० मीटर पुढे यू-टर्न घेऊन इच्छितस्थळी जावे.

वाहनचालकांनी वाहतूक बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group