Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पाटण पंचायत समितीचा ‘कौशल्य, गुणवत्ता व गतिमानता’ कार्यक्रम सुरू; शंभूराज देसाईंच्या हस्ते शुभारंभ

प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर; योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

सातारा : शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय कामकाजात गुणवत्ता व पारदर्शकता आणण्यासह विकासकामांना गती देण्यासाठी पाटण पंचायत समितीच्या वतीने ‘कौशल्य, गुणवत्ता व गतिमानता’ कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ दौलतनगर (मरळी) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

पाटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय यंत्रणेने अधिक सक्षम, कार्यक्षम आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. ते म्हणाले, “गतिमान प्रशासन कसे असते, हे आपण पाटण तालुक्यात जनता दरबाराच्या माध्यमातून सिद्ध केले आहे. शासकीय अधिकारी हे लोकप्रतिनिधींप्रमाणेच जनतेचे सेवक आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासन अधिक गतिमान करायचे आहे.”

केवळ शासकीय योजनांची अंमलबजावणी न करता त्यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवणे, कामांचा दर्जा सुधारणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय वाढवणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून पंचायत समितीचे कामकाज अधिक लोकाभिमुख करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद, सातारा येथील विविध विभागांचे विभागप्रमुख तसेच पंचायत समिती, पाटणच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम आणि अन्य विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आशा सेविका, शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक तसेच पशुसंवर्धन आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

हेही वाचा –  दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा टंचाई दूर करण्याचा सरकारचा निर्णय; ‘व्हीबी जी राम जी’ योजनेत सात नवीन चारा पिकांचा समावेश

कामकाजाचा आढावा घेऊन उपाययोजना निश्चित करणार

प्रशासकीय कामकाजातील कौशल्यवृद्धी, सेवांचा दर्जा, योजनांची परिणामकारक अंमलबजावणी आणि कामातील गतिमानता या मुद्द्यांवर कार्यक्रमांतर्गत विशेष भर दिला जाणार आहे. विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन अडचणी समजून घेणे, त्यावर उपाययोजना निश्चित करणे आणि विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी समन्वित कार्यपद्धती विकसित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता वाढवून विकासकामांना गती देणे आणि शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवणे, या दृष्टीने पाटण तालुक्यातील हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group