Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

अमेरिकेतील मियामी विमानतळावर मोठी दुर्घटना टळली! धावपट्टीवर प्रवासी आणि मालवाहू विमानाची धडक; २ प्रवासी जखमी

Miami Airport | अमेरिकेतील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री धावपट्टीवर दोन विमानांची धडक झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पनामा सिटीहून आलेल्या ‘कोपा एअरलाइन्स’च्या (Copa Airlines) प्रवासी विमानाचा पंखा शेजारील ‘यूपीएस’ (UPS) कंपनीच्या मालवाहू विमानाच्या पुढील भागावर आदळला. या घटनेत दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, या दुर्घटनेमुळे विमानतळावर काही काळ मोठा गोंधळ उडाला होता. ‘एनडीटीव्ही’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

नेमकी दुर्घटना कशी घडली?

शनिवारी रात्री ९:१५ च्या सुमारास ही घटना घडली. पनामा सिटीहून १६६ प्रवासी आणि ६ कर्मचाऱ्यांना घेऊन आलेले कोपा एअरलाइन्सचे बोईंग ७३७ विमान लँडिंगनंतर धावपट्टीवरून (टॅक्सीवे) पुढे सरकत होते. याच वेळी या विमानाचा पंखा तेथे उभ्या असलेल्या यूपीएस कंपनीच्या बोईंग ७६७ मालवाहू विमानाच्या पुढील भागाला जोरदार धडकला. या धडकेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रवासी सुरक्षित; दोन जखमींवर वैद्यकीय उपचार

दुर्घटनेनंतर कोपा एअरलाइन्सने अधिकृत निवेदन जारी करत घटनेची माहिती दिली. कंपनीने म्हटले आहे की, “विमान सुरक्षितपणे टर्मिनलवर पोहोचले असून सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे. या घटनेत दोन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, विमानतळावरील वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर तात्काळ उपचार केले आहेत. उर्वरित सर्व प्रवासी आणि सहा कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत.”

हेही वाचा

मुंबईच्या समुद्रात १५ होर्डिंग्ज उभारण्याचा प्रस्ताव? आदित्य ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका

कंपनीकडून दिलगिरी आणि चौकशीत सहकार्याचे आश्वासन

या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करताना विमान कंपनीने म्हटले की, “या अपघातामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आणि निर्माण झालेल्या चिंतेबद्दल आम्ही दिलगीर आहोत. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. या प्रकरणाच्या तपासात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करू.” विशेष म्हणजे, अमेरिकेतील विमान वाहतूक सेवा काही काळासाठी संपूर्ण देशात ठप्प झाल्याने आधीच प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला होता, त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही दुर्घटना घडली आहे.

मियामी विमानतळावरील दोन महिन्यांतील दुसरा अपघात

दरम्यान, मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन महिन्यांतील हा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी येथे ‘ॲमेझॉन’चे एक कार्गो विमान धावपट्टीवरून घसरल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर पाच जण गंभीर जखमी झाले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group