रिलेशनशिपच्या चर्चांनंतर कोमलने शेअर केले गोविंदासोबतचे नवे फोटो; नेटकऱ्यांसह राखी सावंतच्या कमेंटची चर्चा

Govinda and Komal Rani Swarnkar photos | बॉलिवूडचा ‘हिरो नंबर १’ गोविंदा लवकरच ‘रूपा’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या दोघांचे काही खास फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. कोमल राणी स्वर्णकारने हे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले असून, त्यावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत; विशेष म्हणजे अभिनेत्री राखी सावंतने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कोमलने शेअर केलेल्या फोटोंमध्ये गोविंदाने पांढरा ब्लेझर, काळी पँट आणि मोठा गॉगल परिधान केला आहे, तर कोमलने लव्हेंडर रंगाची साडी, बांगड्या आणि मोजके दागिने असा पारंपरिक लूक केला आहे. काही फोटोंमध्ये दोघे हसताना, तर काही फोटोंमध्ये रोमँटिक अंदाजात पोझ देताना दिसत आहेत. या फोटोंना कोमलने ‘रूपा सिनेमातील सुंदर क्षण’ असे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
हेही वाचा
‘भाजपाचा सत्तेतून पायउतार होण्याचा प्रवास सुरू झालाय’; राज ठाकरे यांचा मोठा दावा
हे फोटो चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असले तरी, गेल्या काही दिवसांपासून गोविंदा आणि कोमल रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते, त्यामुळे या पोस्टवर चाहत्यांच्या संमिश्र कमेंट्स पाहायला मिळत आहेत; काहींनी गोविंदाला आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देत “हिरो नंबर १ खूप हँडसम दिसतोय” आणि “या जोडीला कोणाची नजर लागू नये” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी “हे फोटो प्री-वेडिंग शूटसारखे वाटत आहेत” आणि “हा सिनेमा केव्हापासून बनत आहे व कधी प्रदर्शित होणार?” असे प्रश्न उपस्थित केले आहेत, या सगळ्यात राखी सावंतने रागाचे इमोजी शेअर करत केलेली कमेंट चांगलीच चर्चेत आली आहे.

अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम..
यापूर्वी गोविंदा आणि कोमल मुंबई विमानतळावर एकत्र दिसल्यानंतर तसेच सप्टेंबर महिन्यात मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एकत्र गेल्याने त्यांच्या नात्याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, गोविंदाने या सर्व अफवा फेटाळून लावल्या होत्या, तर कोमलनेही इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून टीकाकारांना सविस्तर उत्तर दिले होते. दरम्यान, ‘रूपा’ या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख (Release Date) अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.




