वाकडच्या ‘दिवाळी संध्ये’त राहुल देशपांडे यांच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध
नगरसेवक राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने ‘दिवाळी संध्या आणि फराळ २०२६’; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल गायनाने वाकडमध्ये ‘दिवाळी संध्या आणि फराळ २०२६’ची मैफल रंगली. भाजपचे नगरसेवक राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने कमल प्रतिष्ठान माउंट लिटेरा स्कूल येथे आयोजित या सांगीतिक सोहळ्याला शहराच्या विविध भागांतून आलेल्या रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दिवाळीनिमित्त नागरिकांना एकत्र येऊन दर्जेदार संगीताचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने कलाटे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशपांडे यांनी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. दिवाळीच्या फराळासोबत रंगलेल्या या मैफलीत नागरिकांना सणाचा आनंद एकत्र साजरा करता आला.

हेही वाचा
स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ठरली अव्वल; राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
मान्यवरांसह नागरिकांची उपस्थिती
कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीचे सदस्य हेमंतराव हरहरे, विश्वास मोरे, अविनाश चिलेकर, सुनील लांडगे, वसंत कलाटे, सभागृह नेते प्रशांत शितोळे, नगरसेविका सुलभाताई उबाळे, भाजपचे शहर सरचिटणीस मधुकर बच्चे, पृथ्वीराज साठे, माजी महापौर नितीन आप्पा काळजे आणि माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ उपस्थित होते.

यावेळी कुणाल वाव्हळकर, चेतन भुजबळ, संजय काटे, काळूराम बारणे, सुरेंद्र भोईर, कुशाग्र कदम, अमित गावडे, अनंत कोऱ्हाळे, प्रमोद कुटे, राजेंद्र तरस, निलेश तरस, बापू कातळे, विराज लांडे, सचिन सानप, निलेश बोराडे, निलेश बारणे, महेश बारणे, सचिन चिखले, गणेश भोंडवे, धनंजय आल्हाट, राजेंद्र गावडे, राजेंद्र करपे, विशाल अप्पा कलाटे, हेमंत डांगे, हरेश नखाते, दिनेश नडे आणि अजिंक्य स्वामी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल गायनाचा आनंद आपल्या भागातील नागरिकांना एकत्रितपणे घेता यावा, हा यामागील मुख्य हेतू होता. आपल्या समृद्ध भारतीय संगीतपरंपरेचा अभिमान जपत, अशा सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, हीच माझी यामागील प्रामाणिक भावना आहे. या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या सर्व मान्यवरांचे, नागरिकांचे आणि रसिकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
– राहुल तानाजी कलाटे, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.




