Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पंकजा मुंडे ऊसतोड मजुरांसोबत साजरी करणार भाऊबीज; मुळशीतील मजुरांच्या पालावर जाणार

दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा सण साजरा करणार; संत तुकाराम साखर कारखाना परिसरात भेट

मुंबई : पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यंदाची दिवाळी भाऊबीज दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या ऊसतोड मजुरांसोबत साजरी करणार आहेत. यानिमित्त त्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील संत तुकाराम साखर कारखाना परिसरात ऊसतोड कामगारांच्या पालावर भेट देणार आहेत.

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ऊसतोड कामगारांचे जीवनही अधिक संघर्षमय झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबातील मुलांच्या वाट्याला आनंदाचे क्षण यावेत आणि त्यांच्यासोबत आपुलकीचे नाते अधिक घट्ट व्हावे, या भावनेतून ऊसतोड कामगार व शेतकऱ्यांसोबत भाऊबीज साजरी करणार असल्याचे मंत्री मुंडे यांनी यापूर्वी जाहीर केले होते.

हेही वाचा –  आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा आनंद; मंत्री दादाजी भुसे यांची नवादे वस्तीला भेट

त्यानुसार सायंकाळी ४ वाजता त्या संत तुकाराम साखर कारखाना, कासारसाई-दारुंब्रे, ता. मुळशी, जि. पुणे येथे ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन भाऊबीज साजरी करणार आहेत. याबाबतची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group