Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“२०२९ मध्ये भाजपाचा पराभव निश्चित”; CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांचा दावा

Abhijeet Dipke | २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) सरकारचा पराभव निश्चित असल्याचा दावा ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे. देशात सत्ताबदल घडवून आणण्यासाठी जनतेने आतापासूनच तयारी सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले. निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कोची येथील ‘राजेंद्र मैदान’ येथे ‘जंतर मंतर अॅट कोची’ या मोहिमेअंतर्गत आयोजित सभेत ते बोलत होते.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी केंद्र सरकार देशातील तरुण पिढीविरुद्ध एकप्रकारे युद्ध पुकारत असल्याचा आरोप दिपके यांनी केला. दिल्लीतील जंतर-मंतरवर तिरंगा हातात घेऊन आंदोलन करताना सीजेपी नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना झालेल्या अटकेचा निषेध करत ते म्हणाले, “तिरंगा फडकवला म्हणून आम्हाला तुरुंगात डांबण्यात आले. अशी परिस्थिती ब्रिटिशांच्या काळात असायची. पण मी देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलो तरी तिरंगा हातात धरणे सोडणार नाही.”

हेही वाचा

वैभव सूर्यवंशीला एकाच सामन्यासाठी का बनवलं कॅप्टन? जाणून घ्या बीसीएच्या निर्णयामागचे नेमकं कारण

“आम्ही अराजकवादी नाही, तर आंबेडकरवादी अन् गांधीवादी”

तरुणांना ‘अराजकवादी’ ठरवणाऱ्यांवर टीका करताना दिपके म्हणाले की, “हा देशाचा तरुण आहे. आम्ही अराजकवादी नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे वारसदार आहोत. देशाची पायाभरणी गांधी, आंबेडकर आणि नेहरूंनी केली आहे. देशात पंतप्रधानांवरही निर्भयपणे टीका करण्याचे स्वातंत्र्य असायला हवे, तरच लोकशाही टिकेल.”

“मोदींना गांधी, आंबेडकर, नेहरूंपेक्षा मोठे होणे शक्य नाही”

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधताना दिपके म्हणाले, “महात्मा गांधी हे भारताचा आत्मा, डॉ. आंबेडकर देशाचा कणा आणि पंडित जवाहरलाल नेहरू आधुनिक भारताचा विचार आहेत. नरेंद्र मोदी पुढे १२० वर्षे जरी सत्तेत राहिले, तरी ते या महापुरुषांपेक्षा मोठे होऊ शकत नाहीत.” तसेच स्वातंत्र्यलढ्याचा संदर्भ देत त्यांनी म्हटले की, हे महान नेते स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी लढत असताना विशिष्ट विचारसरणीचे लोक इंग्रजांची चाकरी करण्यात व्यस्त होते, त्यामुळे असे लोक देशाचा इतिहास बदलू शकत नाहीत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group