वैभव सूर्यवंशीला एकाच सामन्यासाठी का बनवलं कॅप्टन? जाणून घ्या बीसीएच्या निर्णयामागचे नेमकं कारण

Vaibhav Sooryavanshi | आगामी सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीसाठी बिहार क्रिकेट असोसिएशनने (BCA) मोठा निर्णय घेत १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. इतक्या लहान वयात त्याच्याकडे नेतृत्व दिल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच, वैभव या संपूर्ण स्पर्धेत केवळ एकाच सामन्यात बिहारचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही महिन्यांपूर्वीच भारताच्या टी-२० संघात पदार्पण करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात युवा भारतीय खेळाडू ठरलेल्या वैभव सूर्यवंशीची कतार येथे होणाऱ्या ‘एमर्जिंग आशिया चषक’ स्पर्धेसाठी ‘भारत अ’ संघात निवड झाली असून, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी १४ नोव्हेंबरपासून आणि एमर्जिंग आशिया चषक १९ नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याने राष्ट्रीय कर्तव्यासाठी त्याला कतारला रवाना व्हावे लागणार आहे; त्यामुळे तो केवळ पहिल्याच सामन्यात बिहारचे नेतृत्व करू शकेल आणि त्यानंतर उर्वरित सामन्यांसाठी उपकर्णधार सूरज कश्यपकडे संघाची धुरा सोपवली जाणार आहे, दरम्यान कतारमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व तिलक वर्माकडे तर उपकर्णधारपदाची जबाबदारी रजत पाटीदारकडे देण्यात आली आहे.
हेही वाचा
दाक्षिणात्य चित्रपटांचा OTT वर धमाका! नोव्हेंबरमध्ये घरबसल्या पाहा ‘राणाबली’ ते ‘आय अॅम गेम’
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी बिहारचा संपूर्ण संघ
वैभव सूर्यवंशी (कर्णधार – पहिल्या सामन्यापुरता), सूरज कश्यप (उपकर्णधार), आलोक कुमार, आयुष लोहरुका (यष्टिरक्षक), अल्तमश अश्रफ, परम कुमार सिंह, अनमोल कुमार (यष्टिरक्षक), ऋत्विक राज, मयंक कुमार, राघवेंद्र प्रताप, आशीष कुमार, वासुदेव प्रताप सिंह, मोहम्मद इझार, अमोद यादव, प्रशांत सिंह, नवाज खान आणि हिमांशू सिंह.




