वसुबारसनिमित्त गोवत्स पूजन संपन्न; प्रभाग क्र. १९ मध्ये रोहित गोलांडे सोशल वेल्फेअरतर्फे आगळावेगळा उपक्रम

पिंपरी- चिंचवड | भारतीय संस्कृतीतील परंपरा, श्रद्धा आणि गोमातेप्रती असलेली कृतज्ञता जपण्याच्या उद्देशाने वसुबारसच्या पवित्र सणानिमित्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘रोहित गोलांडे सोशल वेल्फेअर’च्या वतीने प्रभाग क्रमांक १९ मधील विविध १० ठिकाणी गोवत्स पूजनाचा अत्यंत सुंदर उपक्रम उत्साहात पार पडला.
या विशेष कार्यक्रमांतर्गत प्रभागातील १० वेगवेगळ्या ठिकाणी गोमातेचे दर्शन घेऊन पूजन करण्यात आले. यावेळी रोहित गोलांडे यांनी स्वतः सर्व ठीकाणी उपस्थित राहून गोमातेचे विधिवत पूजन केले तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या प्रसंगी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

हेही वाचा
‘पहिला दिवा माझ्या राजासाठी’… १००१ दिव्यांनी उजळला ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’चा परिसर!
गोमाता ही भारतीय संस्कृतीचा आणि जीवनशैलीचा कणा मानली जाते. वसुबारसनिमित्त आयोजित या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या संस्कृतीची आठवण करून देत, गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या संवादफेरीत उपस्थितांशी संवाद साधताना सर्वांना दिपोत्सव व दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
”सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो,” अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमामुळे प्रभागात वसुबारसचा सण अत्यंत चैतन्यमय आणि आनंददायी वातावरणात साजरा झाला.




