Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचा आज धर्मध्वजारोहणाने शुभारंभ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची प्रमुख उपस्थिती

दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी फडकणार धर्मध्वज; रामकुंड परिसरात भव्य सोहळ्याची जय्यत तयारी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाहणी

नाशिक : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभारंभाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आज भव्य धर्मध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी धर्मध्वज फडकवण्यात येणार असून, या क्षणापासून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाला सुरुवात होणार आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी रामकुंड परिसर सज्ज झाला आहे. संपूर्ण परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली असून, भव्य मंडप, धार्मिक प्रतीके आणि ऐतिहासिक देखाव्यांच्या माध्यमातून कुंभमेळ्याचा आध्यात्मिक वारसा अधोरेखित करण्यात आला आहे.

राष्ट्रपतींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती

या धर्मध्वजारोहण सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, आठ मंत्री तसेच अनेक राजकीय आणि प्रशासकीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत. देशाच्या विविध भागांतून साधू-महंत आणि धर्मगुरूही या सोहळ्यासाठी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.

हेही वाचा –  महाराष्ट्र बनणार इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे प्रमुख केंद्र; पुण्यात सहा नवीन उत्पादन सुविधांचे उद्घाटन

मुख्यमंत्री फडणवीसांकडून रामकुंड परिसराची पाहणी

धर्मध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा रामकुंड परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यक्रमस्थळाची आणि तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

दुपारी १२:०२ वाजता धर्मध्वज फडकणार

धर्मध्वजारोहणासाठी दुपारी १२ वाजून २ मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. या शुभमुहूर्तावर धर्मध्वज फडकवून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाचा शुभारंभ केला जाणार आहे. या सोहळ्यामुळे नाशिकच्या धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेला विशेष महत्त्व प्राप्त होणार असून, देशभरातील भाविकांचे लक्ष या ऐतिहासिक क्षणाकडे लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button