Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रावेतमध्ये ३.१८ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघांना अटक

पिंपरी | रावेत परिसरात एमडी (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी रावेत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १०६ ग्रॅम मेफेड्रॉन, किंमत ३ लाख १८ हजार रुपये, असा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २.३५ वाजण्याच्या सुमारास रावेत बीआरटी रोडलगत, सेलेस्टियल सिटी सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील किडझी प्री-स्कूलच्या मागील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा

भाजपा मंत्र्याने मागितली गायक दलेर मेहंदींची माफी; जाणून घ्या संपूर्ण वाद..

या प्रकरणी चैतन्य श्याम कांबळे (वय २०) आणि कैलाश देवजी चौधरी (वय २६) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रावेत पोलीस करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group