ऑस्ट्रेलिया विरुद्व भारताचे अग्रस्थान पणाला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/category.jpeg)
दुबई- भारतीय संघ कसोटी क्रिकेट क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. जर भारतीय संघाला आपले अव्वल स्थान कायम ठेवायचे असेल तर या मालिकेतील किमान एक सामना तरी बरोबरीत सोडवावा लगेल. तर ऑस्ट्रेलिया संघाने चार सामन्यांची कसोटी मालिका 4-0 ने जिंकली तर ते पाचव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर पोहचतील, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडून मिळाली आहे.
आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार फलंदाजीमध्ये विराट कोहली पहिल्याच स्थानावर कायम असून त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा बंदी घालण्यात आलेला स्टिव्ह स्मिथ आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आहे. गोलंदाजी विभागात भारताचा रवींद्र जडेजा पाचव्या क्रमांकावर तर रविचंद्रन अश्विन सातव्या स्थानावर कायम आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गुणफरक हा 14 गुणांचा असून जर भारतीय संघाने ही मालिका गमावली तर भारतीय संघाचे गुण कमी होऊ शकतात.