TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; रविंद्र चव्हाणांचा सोलापूर दौरा

शिक्षक संघटनांशी संवाद, संघटनात्मक बैठकांमधून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला बळ

पुणे : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्याचा एकदिवसीय दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध संघटनात्मक बैठका, शिक्षक संघटनांशी संवाद आणि पक्षप्रवेश कार्यक्रमांच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला बळ देण्यासाठी चव्हाण यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संघटनात्मक तयारीचा आढावा घेताना प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, तसेच सरकारच्या लोककल्याणकारी कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवावी, असे त्यांनी सांगितले.

मागासवर्गीय शिक्षक संघटनेशी संवाद

या दौऱ्यात महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या वेळी शिक्षकांच्या मागण्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप-महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. या बैठकीदरम्यान संघटनेने पत्राद्वारे भाजप-महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.

हेही वाचा –  टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर फडणवीसांचा इशारा; ‘मुंबई पोलिसांना कोणी उघडपणे चॅलेंज देऊ शकत नाही’

मंगळवेढ्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती

रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्यादरम्यान मंगळवेढ्यातील विविध स्थानिक लोकप्रतिनिधी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये नगराध्यक्षा सुनंदा आवताडे, सोलापूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे, मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, अनिल बोदाडे, प्रमोद सावंजी, नगरसेविका विद्यागौरी अवघडे, सोमनाथ बुरजे, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक भीमराव येडवे यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले.

तसेच मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे संचालक राजू पाटील व हणमंत मासाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशील आवताडे, उपसभापती सहदेव लवाटे आणि संचालक प्रकाश जुंदळे, पांडुरंग कांबळे व मनोज चव्हाण यांचीही उपस्थिती होती.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती

या दौऱ्यात मंत्री जयकुमार गोरे, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार विजय देशमुख, देवेंद्र कोठे, सुभाष देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी, प्रदेश सचिव तथा माजी आमदार राम सातपुते, सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या दौऱ्याच्या माध्यमातून भाजपने पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संघटनात्मक तयारीवर भर दिला आहे. शिक्षक संघटनांशी संवाद, कार्यकर्त्यांचे नियोजन आणि मतदारांपर्यंत सरकारच्या कामगिरीची माहिती पोहोचवण्यावर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button