Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संपूर्ण राज्यातून मान्सूनची माघार; ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढणार, यंदा मोसमी हंगामात १९ टक्के तूट

मुंबई | महाराष्ट्रातून मोसमी पावसाने (मान्सून) पूर्णपणे माघार घेतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने गुरुवारी केली. राज्यातून पाऊस सरासरी वेळेच्या दोन दिवस आधीच परतला असून, पुढील काही दिवसांत कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा तीव्र होण्याचा इशारा देण्यात आला आहे. यंदा मोसमी पावसावर ‘एल निनो’चा प्रभाव राहिल्यामुळे संपूर्ण हंगामात १९ टक्के, तर एकट्या सप्टेंबर महिन्यात तब्बल ५२ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. परिणामी, मराठवाडा आणि विदर्भासह राज्याला तीव्र दुष्काळी संकटाला सामोरे जावे लागत आहे.

बुधवारपर्यंत ब्रह्मपुरी, परभणी, बारामती आणि हर्णे येथे रेंगाळलेली परतीची रेषा गुरुवारी पुढे सरकली आणि मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण राज्याचा निरोप घेतला. पाऊस थांबल्यामुळे राज्यात हवामान पूर्णपणे कोरडे झाले असून कमाल तापमानात ३ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे. कोकणासह उर्वरित भागात कडक ऊन पडत असल्याने ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात नागरिकांना ‘ऑक्टोबर हिट’च्या तीव्र झळा आणि उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा

भोसरीत ‘सेवा ज्योती यात्रा’; विकसित भारतासाठी योगदानाचा संकल्प

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाची ओढ

यंदा ६ जून रोजी तळकोकणात दाखल झालेल्या मान्सूनचा पुढील प्रवास रेंगाळला होता; २४ जूनपर्यंत त्याने संपूर्ण राज्य व्यापले. संपूर्ण मोसमी हंगामात केवळ जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ४० टक्के अधिक पाऊस झाला. मात्र, त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन अत्यंत महत्त्वाच्या महिन्यांत पावसाने मोठा खंड दिला. सरासरीच्या तुलनेत मोठा तुटवडा निर्माण झाल्याने धरणसाठ्यांवर परिणाम झाला असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सामान्यतः ५ ते १० ऑक्टोबर दरम्यान परतीचा प्रवास पूर्ण होतो; मात्र यंदा त्याआधीच पावसाने निरोप घेतला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group