ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत ‘सेवा ज्योती यात्रा’; विकसित भारतासाठी योगदानाचा संकल्प

‘२५ वर्षे जनसेवेतून राष्ट्रसेवा’ उपक्रमात अडीच हजारांहून अधिक जणांचा सहभाग; मोदी, नितीन नबीन यांचे ऑनलाइन मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड | ‘२५ वर्षे जनसेवेतून राष्ट्रसेवा’ या संकल्पनेवर आधारित ‘सेवा ज्योती यात्रा’ आणि ‘विकसित भारत संकल्प सभा’ भोसरी येथे उत्साहात पार पडली. भाजपचे पदाधिकारी, महिला व युवा कार्यकर्ते आणि नागरिक अशा अडीच हजारांहून अधिक जणांनी सहभाग घेतल्याची माहिती आयोजकांनी दिली. जनसेवेची परंपरा अधिक व्यापक करण्याचा आणि विकसित भारताच्या ध्येयासाठी योगदान देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे मार्गदर्शन उपस्थितांना थेट प्रक्षेपणाद्वारे ऐकवण्यात आले. जनसेवा, राष्ट्रनिर्माण आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय योगदान देण्याचा संदेश या मार्गदर्शनातून देण्यात आला. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी सभेचा परिसर दुमदुमून गेला.

हेही वाचा

दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर पिल्ले हॉलच्या दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात

सेवेची ज्योत घराघरांत पोहोचवणार : काटे

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सार्वजनिक सेवेतील २५ वर्षांचा प्रवास जनसेवा आणि राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी आहे. ‘सेवा ज्योती यात्रे’च्या माध्यमातून सेवेची ही ज्योत पिंपरी-चिंचवडच्या घराघरांत पोहोचवण्यासाठी शहर भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांच्या प्रश्नांवर काम करणे आणि जनसेवा अधिक व्यापक करणे, हा आमचा संकल्प आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे,” असे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी सांगितले.

कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, महापौर रवी लांडगे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि उपमहापौर शर्मिला बाबर उपस्थित होते.

तसेच संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाड्ये, संजय पटणी, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रभारी राजेश अण्णा पिल्ले, युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पालांडे यांनी सहभाग घेतला. शहरातील आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, वरिष्ठ पदाधिकारी आणि विविध आघाड्यांचे अध्यक्षही यावेळी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button