TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

‘अध्यक्षांचा राजीनामा विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवू शकत नाही’; MPSC आंदोलनावर मुरलीधर मोहोळ यांचा सल्ला

‘विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन सरकार निर्णय घेणार’; आंदोलनाच्या आडून राजकारण न करण्याचे मोहोळांचे आवाहन

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील पेपरफुटी, रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि विविध मागण्यांसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या आंदोलनावर भूमिका मांडत विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली असून, विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन परीक्षा प्रक्रियेबाबत निर्णय घेतला जाईल, असे मोहोळ यांनी सांगितले. परीक्षा ऑनलाइन घ्यायची की ऑफलाइन, याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करून निर्णय होईल आणि त्यांना त्रास होईल अशी प्रक्रिया राबवली जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत बोलताना मोहोळ म्हणाले की, अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया घटनात्मक आहे. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला याबाबत माहिती दिली असून, त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मागण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, रोहित पवार यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर समाधान व्यक्त केल्याचे मोहोळ यांनी सांगितले. “विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार चर्चा करत असताना आंदोलन सुरू ठेवण्याचे कारण काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा –  ईव्हीएमवरून ठाकरे बंधूंना आशिष शेलारांचा सवाल; ‘आदित्य ठाकरेंनीही राजीनामा द्यावा’

‘विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण नको’

आंदोलनस्थळी विविध राजकीय पक्षांचे नेते येत असल्याचा उल्लेख करत मोहोळ यांनी आंदोलनाच्या राजकीय वापराबाबत प्रश्न उपस्थित केला. “विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण कुणी करतंय का?” असा सवाल त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या भविष्याचा प्रश्न राजकीय संघर्षाचा विषय होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांचे भविष्य होऊ शकत नाही. रोहित पवारांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करावा. विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करू नका,” असे आवाहन मोहोळ यांनी केले. तसेच आंदोलन स्थगित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पेपरफुटी प्रकरण, रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि परीक्षा पद्धतीसह विविध मागण्यांवर चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारकडून पुढील निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button