प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये अजित पवारांची “क्रेझ”
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/IMG-20181203-WA0006.jpg)
- राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा
- विधिमंडळ कामकाजाची घेतली इत्यंभूत माहिती
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राजकीय धडे मिळावेत, विधीमंडळाचे कामकाज कशा रितीने चालते याचा अनुभव घेता यावा, यासाठी आकुर्डीतील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या वतीने आयोजित अभ्यासदौ-यात विद्यार्थ्यांनी हिवाळी अधिवेशनाचे कामकाज जवळून पाहिले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना पाहून युवकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी तत्काळ फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. यावरून राजकारणात येऊ इच्छीणा-या महाविद्यालयीन तरुणांमध्ये देखील अजित पवार यांचीच क्रेझ असल्याचे दिसत आहे.
आकुर्डीतील प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी अभ्यासदौ-याचे नियोजन केले. 42 विद्यार्थी व शिक्षक अभ्यासदौ-यात सहभागी झाले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी विधिमंडळातील कामकाज कशा पध्दतीने चालते याची माहिती घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग देखील विद्यार्थ्यांनी साधला. त्याचाही अनोखा अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला. विद्यार्थ्यांनी पवार यांना प्रश्न विचारले. पवार यांनी देखील विद्यार्थ्यांना काही महत्वाच्या गोष्टींची माहिती सांगितली. त्यामुळे राजकीय नेत्याचा अनुभव आणि विधिमंडळाचे कामकाज याचा दुहेरी अभ्यास विद्यार्थ्यांना करायला मिळाला.
विद्यार्थ्यांच्या सोबत महाविद्यालयातील प्रा. मनोज मते, प्रा. गोरक्षा डेरे, प्रा. अविनाश काळे, अक्षय बर्गे यांचा सहभाग होता.