“मुंबई इंडियन्सकडूनच खेळणार!”; अभिषेक नायरच्या टोल्यावर रोहित शर्माचे रोखठोक प्रत्युत्तर

Rohit Sharma | आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) हंगामात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोणत्या संघाकडून मैदानात उतरणार? मुंबई इंडियन्स त्याला रिलीज करणार की तो संघात कायम राहणार? या सर्व चर्चांना अखेर खुद्द रोहित शर्मानेच पूर्णविराम दिला आहे. सोनी वाहिनीवर शनिवारपासून सुरू होणाऱ्या आपल्या आगामी कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये रोहितने मुंबई इंडियन्सशी असलेली आपली निष्ठा एका शब्दात व्यक्त करत आपण सदैव मुंबईकडूनच खेळणार असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये रोहितचा निकटवर्तीय मित्र आणि माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर त्याच्यासोबत संवादात दिसतो. रोहितच्या पिवळ्या टी-शर्टवरून फिरकी घेत नायर म्हणाला, “हा रंग कोणत्या संघाचा आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र रोहितला जांभळा आणि सोनेरी रंग, म्हणजेच केकेआरची (KKR) जर्सी अधिक शोभून दिसेल.” या संवादानंतर उपस्थित प्रेक्षकांनी ‘मुंबई… मुंबई’ आणि ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’ अशा प्रचंड घोषणा दिल्या. यावर रोहितने हसतमुखाने केवळ एकाच शब्दात उत्तर दिले— “फॉरएव्हर” (Forever). या एका शब्दातून त्याने आपण मुंबई इंडियन्सची साथ कधीही सोडणार नसल्याचे अधोरेखित केले.
हेही वाचा
रशियावरील निर्बंध विधेयकावर ट्रम्प यांची स्वाक्षरी; भारतावर १००% टॅरिफची टांगती तलवार
Dosti pakki, roasting bhi pakki 😂
Dekhiye Family Full House with Rohit Sharma, kal raat se, Sat-Sun 9:30 baje, sirf #SonyEntertainmentTelevision aur Sony LIV par.#RohitSharma #FamilyFullHouse #SonyTV pic.twitter.com/GvQaQJltGJ
— sonytv (@SonyTV) September 18, 2026
कर्णधारपद गमावल्यानंतरच्या चर्चांना उत्तर
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल पाच आयपीएल जेतेपदे पटकावली असून तो स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. मात्र, गेल्या हंगामात संघ व्यवस्थापनाने त्याच्या जागी हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवले होते. हार्दिकच्या नेतृत्वात संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आणि संघ गुणतालिकेत तळाशी फेकला गेला. त्यामुळे रोहित संघ सोडणार किंवा दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये जाणार अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र, रोहितने या वक्तव्यातून चाहत्यांच्या मनातील सर्व शंका दूर केल्या आहेत.




