TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

बॉम्बच्या धमकीने इंडिगो विमानाचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

लखनऊ-दम्मम विमानात ‘बॉम्ब’ असा शब्द लिहिलेला कागद सापडला; विमान आयसोलेशन बेमध्ये हलवून तपासणी सुरू

अहमदाबाद : लखनऊहून सौदी अरेबियातील दम्ममकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने गुरुवारी अहमदाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या घटनेनंतर विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, विमानात ‘बॉम्ब’ असा शब्द लिहिलेला टिश्यू पेपर आढळून आला. त्यानंतर विमानाचा मार्ग बदलून ते अहमदाबाद विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमानाला स्वतंत्र आयसोलेशन बेमध्ये हलवण्यात आले असून, सुरक्षा यंत्रणांकडून विमानाची तपासणी केली जात आहे.

अहमदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊ-दम्मम मार्गावरील इंडिगोचे 6E 97 हे विमान बॉम्बच्या धमकीनंतर अहमदाबाद विमानतळावर उतरवण्यात आले. एका कर्मचाऱ्याला ‘बॉम्ब’ असा उल्लेख असलेला कागदाचा तुकडा आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले.

प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने सुरक्षा प्रोटोकॉल सक्रिय करण्यात आले. विमानाची आवश्यक तपासणी आणि इतर सुरक्षा प्रक्रिया सध्या सुरू आहेत.

हेही वाचा –  MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; मुख्यमंत्री फडणवीसांकडून ऐतिहासिक निर्णयांची घोषणा

काही दिवसांपूर्वी इंडिगोच्या विमानाला अपघात

दरम्यान, काही दिवसांपूर्वी इंडिगोच्या आणखी एका विमानाला श्रीनगर विमानतळावर पार्किंगदरम्यान अपघात झाला होता. नवी मुंबईहून आलेले इंडिगोचे 6E 225 (VT-NOG) हे विमान बे क्रमांक ६ वर पार्क करताना व्हिज्युअल डॉकिंग गायडन्स सिस्टमच्या (VDGS) खांबाला धडकले.

या घटनेत विमानाचे नुकसान झाले होते. मात्र, विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नव्हती. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माहितीनुसार, प्रवाशांना मॅन्युअल शिडीच्या मदतीने विमानातून सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group