ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
अनवाइंड फिजिओथेरपी क्लिनिककडून सावली निवारा केंद्रात अन्नदान

पुणे : सामाजिक बांधिलकी जपत अनवाइंड फिजिओथेरपी ऑर्थो अँड न्यूरो रिहॅब क्लिनिकच्या वतीने सावली निवारा केंद्र येथे अन्नदानाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. क्लिनिकच्या डॉ. महत्त्वाकांक्षा हिराणी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मॅग्नम’चे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

यावेळी सिंहनाद ग्रुपचे अक्षय दरे, राहुल सांडभोर, सुचित भाऊ, ॲड. स्वाती पावडे, मंगेश परब, विशाल शहा, मंगेश शिंदे आणि संतोष सुर्वे यांची उपस्थिती होती. गरजू नागरिकांना अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. उपस्थितांच्या सहभागामुळे हा उपक्रम उत्साहात पार पडला.




